Menu Close

कृषिपूरक व्यवसाय – केळीपासून बनवू शकता १० पेक्षा जास्त पदार्थ.

केळी हे शक्तिवर्धक व स्वस्त फळ आहे. त्यामध्ये साखर, प्रथिने, स्निग्धांशाचे प्रमाण जास्त आहे. चुना, लोह, स्फुरद ही खनिजे आणि क व अ ही जीवनसत्चे केळीमध्ये आहेत. केळी हे पचायला सोपे फळ असून त्यात अनेक औषधी गुणधर्म आहेत. केळीच्या फळाचे अनेक टिकाऊ पदार्थ व लगेच खाण्याचे पदार्थ तयार होऊ शकतात.

केळीपासून १० पेक्षा जास्त पदार्थ बनवता येऊ शकतात. हे पदार्थ बनवण्याची प्रक्रिया पाहुयात…

चिप्प्स
पूर्ण वाढ झालेली १० टक्के परिपक अशी केळी निवडावीत. ही केळी स्वच्छ पाण्याने धुऊन किंवा ओल्या स्वच्छ फडक्याने पुसून घ्यावीत. स्टीलच्या चाकूने फळांची साल काढावी. केळी सोलण्याचे मशीन विकसित करण्यात आले आहे. या मशीनची ताशी ४५० (८० टक्के परिपक्र असलेली) केळी एका दिवसात सोलण्याची क्षमता आहे. मशीनच्या सहाय्याने ०.३ ते ०.५ मि.मी. जाडीच्या चकत्या कापान्यात. मशीन उपलब्ध नसल्यास स्टीलच्या चाकूने गोल, पातळ काप करावेत. साध्या चाकूने काप केल्यास ते काळे पडतात. काप काळसर पडून नयेत व ते पांढरेशुभ्र होण्यासाठी ०.१ टका सायट्रिक अॅसिड किंवा पोटेंशियम मेटबाय सल्फाइडच्या द्रावणात १५ ते २० मिनिटे बुड़नून ठेवावेत.

नंतर चकत्या उकळत्या पाण्थात ४ ते ५ मिनिटे थंड करून प्रतिकेिली चकत्यास ४ ग्रॅम या प्रमाणात गंधक घेऊन त्याची धुरी द्याची. या चकत्या उन्हात किंवा ड्रायरमध्ये सुकवाव्यात. जर ड्रायरमध्ये चकत्या सुकवायच्या असतील, तर ड्रायरमधील तापमान ५० ते ५५ अंश एवढे ठेवावे. चकत्या ह्याताने दाबल्या असता मोडल्यास त्या तयार झाल्या आहेत, असे समजाचे व सुकविण्याचे काम थांबवावे. विक्रीसाठी केिंचा जास्त दिवस टिकविण्यासाठी है वेफर्स हाथ डेन्सिटी पॉलिथीन पिशव्यात घालून हवाबंद डब्यात साठवाव्यात.

भुकटीकेळीच्या भुकटीला परदेशात भरपूर मागणी आहे. यापासून आपणास परकीय चलनही मिळू शकते. यासाठी पूर्ण पिकलेली केळी वापरतात. प्रथम केळी स्वच्छ पाण्याने धुऊन घेतात. केळीची साल काढून पल्पर यंत्राच्या सहाय्याने लगदा करून घेतात. केळीच्या गराच्या लगद्याची भुकटी स्प्रे ड्रायर किंवा ड्रम ड्रायर किंचा फोम मेंट ड्रायरच्या सहाय्याने करतात. तयार झालेली भुकटी निर्जतुक हवाबंद डब्यात साठवून कोरड्या व थंड जागी साठवितात. त्याचा वापर लहान मुलांच्या आहारात केला जातो. बिस्किटे व बेकरीमध्ये तसेच आइस्क्रोममध्ये केळीच्या भुकटीचा वापर केला जातो.


पीठ
केळीचे पीठ तयार करण्यासाठी कच्ची केळी वापरली जातात.

एक केिलो पीठ तयार करण्यासाठी साधारणपणे साडेतीन केिली गर लागतो. यासाठी प्रथम केळी स्वच्छ पाण्याने धुऊन, साल काढून त्याच्या चकत्या किंवा बारीक तुकडे करून सुकवतात. सुकविण्यासाठी सूर्याच्या उष्णतेचा किंवा वाळवणी यंत्राचा वापर करतात. केळीच्या चकत्या वाळवून त्याच्यातील पाण्याचे प्रमाण आठ टक्क्यांपेक्षाही कमी आणले जाते. नंतर या चकत्यांपासून दळणी यंत्राचा वापर करून पीठ तयार करतात. हे पीठ जर काळे पडत असेल, तर पोटॅशिअम मेटाबाथसल्फाईडच्या 0.०५ तें 0.0६ टका तीव्रतेच्या द्रावणात ३० ते ४५ मिनिटे केळ्याच्या चकत्या बुडवून वाळवतात व नंतर पीठ तयार करतात. तयार झालेले पीठ प्लॅस्टिकच्या पिशव्यांत भरून कोरड्या व थंड जागी साठवितात. केळीच्या पिठामध्ये ७o ते ८० टक्के स्टार्च असतें. त्याचप्रमाणे शैव, चकली, गुलाबजाम इत्यादी उपवासाचे पदार्थ तयार करण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो.

जेली
५० टक्के पक्र फळाचा गर पाण्यात एकजीव करून १५ ते २0 मिनिटे गरम करावा. गरगाळून घ्यावा. गाळलेल्या गरात समप्रमाणात साखर, ०.५ टक्के सायट्रेिक आम्ल व पेक्टीन टाकून उकळी येईपर्यंत शिजवावे. या वेळी मिश्रणाचे तापमान साधारणपणे १०४ अंश से.असते. तयार जेलीमध्ये एकूण घन पदार्थाचे प्रमाण ७० डिग्री ब्रिक्स इतके असते. जेली गरम असतानाच निर्जतुक बाटल्यांमध्ये भरावी. पेरूच्या जेलीपेक्षा केळीची जेली पारदर्शक व स्वादिष्ट असते.

जॅम
कोणत्याही जातीच्या पूर्ण पिकलेल्या केळीचा वापर जॅम तयार करण्यासाठी करता येतो. गराच्या वजनाएवढी साखर मिसळून गर मंद अग्रीवर शिजवावा. साखर पूर्णपणे विरघळल्यावर ०.५ टक्के पेक्टीन, ०.३ टक्के सायट्रेिक आम्ल व रंग टाकून मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवावे. मिश्रणाचा ब्रिक्स ६८ ते ७0 डिग्री झाल्यावर जॅम तयार झाला, असे समजावे. तयार जॅम कोरड्या व निर्जतुक बाटल्यांमध्ये भरावा. ह्या पदार्थ एक वर्षापर्यंत टिकू शकतो.


बनाना प्युरी
प्युरी म्हणजे पिकलेल्या ताज्या फळातील गर, रुस किंवा लगद्यावर विशिष्ट प्रक्रिया करुन सॉसप्रमाणे त्याचे स्वरुप बदलवले जाते. त्यामध्ये ताज्या फळांचा मूळ स्वाद, रंग, सुगंध कायम राहील, याची दक्षता घेतली जाते. प्युरीचा वापर मिल्कशेक, आइस्क्रीम, फळांचा रस इत्यादी विविध पदार्थात केला जातो. पिकलेल्या केळ्याचा गर पल्पर मशीनमधून काढून लगदा हवाविरहित करतात व निर्जतुकीकरण करून हवाबंद डब्यात भरुन ठेवतात. गर टिकविण्यासाठी त्यात कोणत्याही प्रकारच्या रसायनाचा अथवा साखरेचा वापर केला जात नाही. हे निर्याताभिमुख उत्पादन एका वर्षापर्यंत साठवून ठेवता येते.

कच्च्या केळीचे वडे
वडे बनविण्यासाठी ४-५ कची केळी, ४ हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा हळद, मोहरी, मीठ, तेल लागते. वडे बनविताना प्रथम केळी सोलून लहान तुकडे करून पाणी न घालता वाफवून घेऊन त्यामध्ये लगदा परतावा. गार झाल्यावर हिरव्या मिरच्या व आले जाडसर वाटून घाला. बटाटेवडे बनविताना डाळीचे पीठ भिजवतो त्याप्रमाणे भिजवा. केळाच्या मिश्रणाचे वडे बनवून बेसनात बुडवून तळून घ्या. तयार झालेले वडे खोब-याच्या चटणीबरोबर खाण्यास वापरावे.

ज्यूस
या प्रक्रियेत पूर्ण पक्र केळ्याचा पल्पर मशीनचे गर काढतात. गर घट्ट असल्याने सर्वसाधारण स्वरुपात रस काढता येत नाही. त्याकरिता पाच मि.लि. प्रतिकिलो या प्रमाणात पेक्टीनेज एन्झाइम मिसळून दोन तास ठेवल्यानंतर स्वच्छ रस सहज मिळतो. या रसाची गोडी २४ ते २६ डिग्री ब्रिक्स असते. या रसात दीड पट पाणी मिसळून, आवश्यकतेनुसार सायट्रिक आम्ल टाकून आरटीएस बनविता येते. त्याची गोडी १५ डिग्री ब्रिक्स व आम्लता o.३ टक्के असते. हे पेय ८५ अंश से. तापमानाला पाश्चराइज्ड करून निर्जतुक बाटल्यांमध्ये भरावे. हा पदार्थ सहा महिन्यांपर्यंत टिकू शकतो. केळीपासून ८८ टक्के रसाचे प्रमाण मिळते.

केळ्याचे सुके अंजीर
पूर्ण पिकलेली केळी सोलून, पोटॅशियम मेटाबायसल्फाईडच्या १ टक्के द्रावणात बुडवून घ्या. नंतर त्याचे २.५ मि.मी. काप बनवून उन्हात वाळवा किंवा ५० अंश से. तापमानाला २४ तास ओव्हनमध्ये किंवा ड्रायरमध्ये ठेवून वाळवा. पॉलिथीनच्या पेिशव्यांमध्ये हवाबंद करून ठेवल्यास ४ ते ६ महिने सहज टिकतात. सुक्या अंजिराप्रमाणे ही अंजीर अत्यंत चविष्ट लागतात.


केळी बिस्कीट
केळी पिठात ३० टक्के मैदा मिसळून त्यामध्ये साखर, वनस्पती, तूप, बेकिंग पावडर, दूध पावडर, इसेन्स गरजेप्रमाणे मिसळ. योग्य प्रमाणात पाणी घेऊन त्याचा लगदा करा. हा लगदा साच्यात टाकून ओव्हनमध्ये ठेवून द्या. ही बिस्किटे अतिशय चविष्ट आणि पौष्टिक असतात.

व्हिनेगर
अतिपक्र व खाण्यास योग्य नसलेल्या केळीपासून व्हिनेगर तयार करता येतो. केळीचा गर पाण्यात मिसळून घ्यावा. त्यात यीस्ट टाकून ४८ तास मिश्रण स्थिर ठेवा. त्यात माल्ट व्हिनेगरचे मुरवण २o ते ३o मि.लि. प्रति लिटर या प्रमाणात मिसळावे. हे मिश्रण ३o अंश से.तापमानात आांबवण्यास ठेवावे. ही रासायनिक किंवा (अॅसिडीफिकेशन) दोन ते तीन अठवड्यात पूर्ण होते. नंतर सेंट्रेिफ्यूज करून व्हिनेगर वेगळे करतात व निर्जतुक केलेल्या स्वच्छ बाटल्यांत भरून हवाबंद साठवितात


कच्च्या केळीची भाजी
भाजीची ३ कची केळी, ३-४ हिरव्या मिरच्या, १ नारळ, ५-६ छोटे कांदे, १ चमचा जिरे, २ कडीलिंबाचे डहाळे, १ डाव तेल, चवीनुसार मीठ केळीची साले काढून प्रत्येक केळ्याचे १६ तुकडे करावेत व ते थोड्या पाण्यात मीठ घालून त्यात केळीच्या फोडी टाकून मंदाग्रीवर त्या शिजवून घ्याव्यात. सर्व पाणी आटून केळ्याच्या फोडी कोरड्या कराव्यात. १/२ नारळ व जिरे बारीक वाटून केळांवर घालावे. सतत हळद, मोहरी घालून फोडणी करावी. नंतर त्यात बारीक चिरलेला कांदा परतून घ्यावा. कांदा गुलाबी रंगावर आला, की त्यात खोबरे खवून घालावे व जरा परतावे. त्यात शिजलेली केळी टाकून पुन्हा जरा परतावे व उतरवावे. आता ही भाजी तयार झाली.

केळीचे आणखी काही रुचकर पदार्थ

खमंग बनाना शेवसाहित्य :
पाव पेला तांदळाचे पीठ, अर्धा पेला बेसन, १ कचे वाफवलेले केळे, २ चमचे आले-लसूण पेस्ट, हिरवी मिरची पेस्ट, अर्धा चमचा लिंबाचा रस, अर्धा चमचा बेकिंग पावडर, मीठ, तेल. कृती : तांदळाचे पीठ, बेसन व सोडा एकत्र चाळणीने चाळून घ्या. त्यात उकडलेले केळे सोलून मिसळा. आले, लसूण-मिरची पेस्ट, मीठ व एक चमचा तेल टाकून मिसळा. कढईत तेल गरम करा. शेव गाळण्याच्या यंत्राने बारीक शेव पाडून तळा.


केळ्याचे गुलाबजाम
एक पेला रवा, अर्धा पेला दूध, २ लहान चमचे पनीर, १ पिकलेले केळे, १ पेला साखर, थोडे, तेल कृती : एक चमचा दुधात केशर भिजवा, रवा परतून घ्या. एका डिशमध्ये पनीर, रवा दूध व केळे घालून मळून घ्या. लिंबाच्या आकाराचे गोळे बनवा. कढईत तेल गरम करून सोनेरी रंगावर तळून घ्या. एका भांड्यात १ पेला साखर व १ पेला पाणी उकळून पाक तयार करा. पाकात केशर घाला. कळ्याच गुलाबजाम पाकात घालून लगेच खाण्यास द्या.

केळ्याची बाकरवडी साहित्य
६ कची केळी, २ लहान चमचे आले मिरची पेस्ट, एका लिंबाचा रस, २ पेले मैदा, २ लहान चमचे चिरलेली कोथिंबीर, २ चमचे तेल, चवीला मीठ, तळण्यासाठी तेल. कृती : केळी वाफवून घ्या. त्यानंतर ती सोलून कुस्करा. त्यात आले मिरची पेस्ट लिंबाचा रस मीठ, कोथिंबीर घालून मळून घ्या व दोन भाग करा. मैद्यात मीठ व तेल मिसळून व मळून घ्या. याचेही दोन भाग करा, एक भाग चपातीप्रमाणे लाटा व केळ्याचे मिश्रण त्यावर पसरून गुंडाळी करा व कडा बंद करा. आता या रोलचे स्लाइस करा व गरम तेलात तळून घ्या.

अशा प्रकारे तुम्ही केळीपासून अनेकविध पदार्थ बनवू शकता. स्थानिक मार्केट, घरगुती विक्री तसेच पॅकिंग विक्री अशा मार्गांनी विक्री करता येईल. व्यवसाय घरगुती स्तरावर सुरु करू शकता किंवा चांगला प्रोजेक्ट उभारू शकता.

_

स्त्रोत – कृषी विभाग महाराष्ट्र शासन
विकासपीडिया

Posted in कृषिपूरक व्यवसाय

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *