Menu Close

कृषिपूरक व्यवसाय – टोमॅटो केचप उद्योग

टोमॅटो केचप हे शहर व ग्रामीण दोन्ही भागात मोठ्या प्रमाणात वापरले जाते. केचपला वर्षभर मागणी असते. कमी गुंतवणुकीमधे केचप उद्योग सुरु करता येऊ शकतो.

केचप प्रक्रिया

  • केचप तयार करण्यासाठी टोमॅटोचा रस तीन किलो तसेच कांदा चाळीस ग्रॅम, लसूण तीन ग्रॅम तसेच लवंग, दालचिनी, जायपत्री, मिरची पूड तसेच काळी मिरी, विलायची प्रत्येकी दोन दोन ग्रॅम, मीठ 30 ग्रॅम, साखर 150 ग्रॅम व 100 एम एल विनेगर वापरावे.
  • यासाठी प्रथम टोमॅटोचा रस पातेल्यात ओतून त्यामध्ये एकूण साखरेच्या 1/3 साखर टाकावी व सर्व मसाल्याचे पदार्थ जसेच्या तसे मलमल कापडात बांधून त्यांची पुरचुंडी बांधावी. हे बांधलेली पुरचुंडी पातेल्यात रसामध्ये बुडवून तरंगत ठेवावी.
  • पातेले हे मंद आचेवर ठेवून मूळ रसाच्या तिसऱ्या हिश्यापर्यंत रस आटवावा. रस आटवत असताना पळीने पुरचुंडीला हळुवारपणे अधून मधून सतत दाबत राहावे. यामुळे मसाल्यांचा जो काही अर्क असतो तो रसामध्ये मिसळला जातो व एकजीव होतो.
  • रसामध्ये व्हिनेगर घालून व राहिलेली साखर दोन्ही एकत्र घालून रस पुन्हा मुळ रसाच्या 1/3 आकारमान येईपर्यंत आटवावा व थोडा वेळ तसाच राहू द्यावा. त्यानंतर थंड रिफ्रॅक्टो मीटर च्या साह्याने त्याचा ब्रिक्स मोजल्यास त्याचा 28 अंश सेंटीग्रेड इतका येतो. अशाप्रकारे तयार झालेल्या केचपमध्ये प्रति किलो 300 एम एल ग्रॅम सोडियम बेंजोएट टाकावे व एकजीव करून घ्यावे.
  • निर्जंतुक केलेल्या 500 ग्राम किंवा एक किलो आकाराच्या बाटल्यांमध्ये भरून क्राऊन कॉक मशीनच्या साह्याने झाकून हवा बंद कराव्यात व त्यांना थंड व कोरड्या जागी ठेवावे.

पॅकिंग

केचप पॅकिंग साठी काचेच्या बॉटल्स आवश्यक आहेत.
तुम्ही पाऊच पॅकिंग करणार असाल तर पाऊच, सिलिंग मशीन आवश्यक आहे
उद्योग मोठ्या क्षमतेचा असेल तर ऑटोमॅटिक पॅकिंग मशीन सुद्धा घेऊ शकता.
लेबलिंग मशीन आवश्यक आहे

गुंतवणूक

हा उद्योग अतिशय कमी गुंतवणुकीत सुरु करता येऊ शकतो, परंतु चांगल्या सेटपसह उद्योग उभारणीसाठी ५ ते १० लाख रुपयांची गुंतवणूक आवश्यक आहे.

शासकीय योजना
राज्य शासनाकडून CMEGP योजनेअंतर्गत १५-३५% पर्यंत सबसिडी मिळू शकते

____________________

संकलन : कृषीराज्य

Posted in कृषिपूरक व्यवसाय, व्यवसाय माहिती

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *