Menu Close

A1 दुध आणि A2 दुधामधे काय फरक असतो, कोणते दूध आरोग्यासाठी फायदेशीर असते? जाणून घ्या…

दुधामधे प्रथीने (proteins) असतात. प्रथीने केसीनपासून बनतात. ह्या केसीनमधे अमिनो आम्ले (amino acids) असतात. दुधामधील केसीनच्या प्रकारावरुन दुधाचे दोन प्रकार पडले आहेत A1 दूध आणि A2 दूध.

A1 दूध – विदेशी वंशाच्या काऊ संबोधल्या जाणारया जर्सी, होल्स्टेन फ्रीजीयन, रेड डॅनिश यांचे तसेच यांपासून तयार केलेल्या संकरीत गायी यांचे दूध हे A1 प्रकारचे असते. या प्राण्यांच्या पाठीला वशिंड (Hump) नसते.

A2 दूध – भारतीय वंशाच्या देशी गायींचे दूध हे A2 प्रकारचे असते. या मूळ भारतातील गायी असून त्यांच्या पाठीला वशिंड Hump असते. या दुधातील प्रथीन हे A2 बीटा केसीन प्रकारचे असल्याने या दुधास A2 दूध असे म्हणतात. यामधे प्रोलाइन (proline) नावाचे मानवी आरोग्यास अत्यंत पोषक अमिनो आम्ल असते.

A1 दुधाचे घातक परिणाम – या प्रकारच्या दुधातील प्रथीन हे A1 बीटा केसीन प्रकारचे असते. म्हणून या दुधास A1 दुध असे म्हणतात. या दुधातील या प्रथीनामधे हिस्टीडीन ( Histidine ) नावाचे घातक अमिनो आम्ल असते. जेव्हा हे दूध प्यायले जाते त्यावेळी लहान आतड्यामधे त्याचे पचन होताना हिस्टीडीन विभक्त (split ) होते व त्यापासून बी सी एम 7 (BCM 7 Beta Caso Morphine 7) हे अमली पदार्थांच्या गटातील एक अतिशय घातक रसायन बाहेर पडते. हे BCM 7 थेटस्वादुपिंडावर (pancreas) हल्ला करुन तेथील इनसुलीनची (Insulin) निर्मिती पूर्ण बंद पाडते.

आपणा सर्वाना माहीत आहे की इनसुलीन हे रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्याचे कार्य करत असते. ते कमी झाल्यावर मधुमेह हा रोग होतो. आणि तसेही आता मधुमेही रुग्ण घरोघरी झाल्यामुळे इनसुलीन हा शब्द प्रत्येकाच्या तोंडी असतोच. आता विचार करा A1 दुधातील BCM 7 मुळे जर इनसुलीन ची निर्मिती बंद पडली तर त्याचे परिणाम किती भयानक असतील, यामुळे पहिला परिणाम होतो तो म्हणजे अशा व्यक्तीला मधुमेह (Diabetes) हा रोग होतो. पण एवढ्यावरच हे संकट थांबत नाही, कारण आपल्या शरीरातील प्रत्येक अवयव इतर अवयवांशी जोडलेला असल्यामुळे त्यांचे कार्य संयुक्तपणे चालते. या दुधामुळे हृदयरोग, ऑटीझम (स्वमग्नता) स्किझोफ्रेनिया, कॅन्सर, किडनीचे रोग, स्त्रियांमधील एंडोमेट्रियॉसिस यामुळे गर्भाशयाच्या अस्तराला सुज येऊन स्त्रियांमधे वांझपणा येतो डोळ्यांची दृष्टी कमी होणे, पुरुषांमधील नपुंसकत्व इत्यादी एकुण 80 प्रकारचे रोग माणसाला होतात. असे न्युझीलंडमधे झालेल्या सरकारी संशोधनावरुन सिध्द झाले आहे.

न्युझीलंडमधे लहान वयातील मुलांमध्ये मधुमेहाचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढले होते. त्याची कारणे शोधण्यासाठी शासनाने तज्ज्ञांची समिती 1993 मधे नेमली होती. या समितीने मधुमेही लहान मुलांच्या आहाराचे जैवरासायनिक विश्लेषण (biochemical analysis) केले तेव्हा त्यांच्या निदर्शनास धक्कादायक बाब आली ती म्हणजे या सर्व रोगाचे कारण म्हणजे जर्सी, होल्स्टेन फ्रीजीयन, रेड डॅनिश या काऊ चे दुध हे आहे. या संशोधनानंतर या विषयावर परत 97 वेळा विविध तज्ज्ञ्यांनी अभ्यास केला. सर्वांचा निष्कर्ष सारखाच आहे. भारतीयांचे डोळे खाडकन उघडावे अशी घटना म्हणजे जेव्हा या शास्त्रज्ञांनी भारतीय वंशाच्या गायीच्या दुधाचा अभ्यास केला तेव्हा त्यांच्या असे लक्षात आले की भारतीय गायीचे दुध हे A2 प्रकारचे असुन ते आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. इतकेच नाही तर मधुमेह ह्रदयरोग कॅन्सर इ. विविध आजार दूर करण्याची त्यामधे क्षमता आहे. भारतीय देशी गायीच्या तुपामुळे ह्रदयरोग्याच्या रक्तवाहिन्यांमधील कोलेस्टेरॉल दूर होते तर गोमुत्रामुळे कॅन्सर बरा होतो. दुधावरील या संशोधनामुळे न्युझीलंड, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, ब्राझील या देशांमधे जर्सी, होल्स्टेन फ्रिजियन या प्राण्यांचे A1 दूध पिणे बंद केले असुन भारतीय गायींच्या दुधाला प्रचंड मागणी वाढली आहे. इतकेच काय पण तिथे विकल्या जाणाऱ्या दुधाच्या पिशव्यांवरही ते दुध A1 आहे की A2 आहे हे लिहिण्याचे बंधन आहे.

भारतात मात्र या बाबतील पूर्ण गोंधळच आहे. अजुन दुधाच्या A1 व 2 मधील फरकच माहित नाही. सर्वसामान्य जनतेला गायीचे दूध (cow milk) जर्सीचे दुध प्यायल्यामुळे मधुमेहाचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. अगदी लहान मुलांमध्ये देखील मधुमेहाचे प्रमाण खूप वाढले आहे. आम्ही एकीकडून मधुमेहावर उपाय म्हणून महागडी औषधे घेतो तर दुसरीकडे गायीचे समजून जर्सीचे A1 दुध पितो, कसा रोग बरा होणार ?

एके काळी देशी गायींच्या दुधाने समृध्द असणाऱ्या आपल्या देशात आज देशी गायीचे दूध मिळणे अवघड बनले. देशी गायीचे तूप मिळणे तर फारच दुर्मिळ, कसेबसे राजस्थानातील पथमेडा या ठिकाणी शुध्द देशी गायींना जतन केले आहे. प्रयत्नपूर्वक तेथील शुध्द गायीचे तुप मिळू शकते ही त्यातल्या त्यात जमेची बाब. परदेशांनी मात्र गेल्या काही वर्षात भारतामधून देशी गायी नेऊन त्यांची उत्तम शुध्द स्वरुपात जोपासना केली आहे. ब्राझीलमधे साठ लक्ष शुध्द भारतीय गीर गायी आहेत, तर मूळ भारतात त्यांची संख्या फक्त काही हजारावर शिल्लक आहे.

________

योगदानकर्ते

कार्तिक कुबडे (पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषी विदयापीठ, राहुरी)
सोनी खोब्रागडे (पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषी विदयापीठ, राहुरी)
डॉ. कल्याणी कांबळे (पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी )

Vikaspedia

Posted in शेती माहिती

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *